Friday, August 11, 2017

अब्जाधीश पित्याने मुलाला शिकवला


अब्जाधीश पित्याने मुलाला शिकवला ''जीवन जगण्याचा धडा''.
------------------------------------ तुम्हाला गुजरातमधील हि-यांचे प्रसिद्ध व्यापारी सावजी ढोलकिया तर माहितच असतील. होय, हे तेच व्यापारी आहेत ज्यांनी आपल्या कर्मचा-यांना बोनसच्या रुपात गाडी आणि फ्लॅट दिले होते. ६००० कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले सावजी ढोलकिया आजकाल त्यांचा मुलगा द्रव्य याला अनोखी शिकवण देण्यासाठी चर्चेत आले आहेत. सावजी यांनी आपल्या २१ वर्षीय मुलाला आयुष्यातील कठीण प्रसंगांना कसे सामोरे जावे याचे धडे शिकवायचे ठरविले आहे. मुलांना लाडाकोडात वाढवण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्याचे अती लाडाचे दुष्परिणामांची मोठी चर्चा ही होत असते. मुलांना कसे वाढवले पाहिजे आणि त्यांच्यातील क्षमतांची वाढ कशी केल पाहिजे याचा उत्तम धडा गुजरात येथील हिऱ्यांचे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी घालून दिला आहे. ६ हजार कोटींची कंपनी चालवणाऱ्या ढोलकिया यांनी त्यांचा मुलगा द्रव्य याला कोचीमध्ये पाठवले होतेकोचीत कसेही १ महिना जगून दाखव असे त्यांनी द्रव्यला सांगितले. वडिलांची हा आदेश द्रव्यने मानत कोचीत एका बेकरीमध्ये १ महिना नोकरी केली. सावजी यांची गुजरातमध्ये हरेकृष्ण डायमंड एक्सपोर्ट या कंपनीचे मालक आहेत. ७१ देशांत ते हिरे पाठवतात. त्यांचा मुलगा द्रव्य २१ वर्षांचा असून तो अमेरिकेत एमबीए करतो. घरी तो सुटीवर आला असताना वडिलांनी त्याची रवानगी कोची येथे केली आहे. सावजी यांनी द्रव्यला ७ हजार रुपये खर्चासाठी दिले असून हे पैसे अगदीच निकड पडली तरच खर्च करण्याची सक्त सुचना त्याला दिली होती. मी त्याला ३ सुचना केल्या होत्या. एक म्हणजे त्याने नोकरी मिळवण्यासाठी कोठेही माझी ओळख सांगायची नाही, मोबाईल वापरयचा नाही आणि मी दिलेले ७ हजार रुपये खर्च करायचे नाहीत. गरीब कसे जगतात, नोकरी मिळवण्याचा संघर्ष काय असतो हे त्याला कळले पाहिजे. म्हणून मी त्याला एक महिना तुझ्या पायावर उभे राहून दाखव असे सांगितले होते, असे सावजी म्हणाले. तसेच एकाच ठिकाणी एक आठवड्यापेक्षा जास्त काळ नोकरी करायची नाही अशी ही त्याला सुचना होती. द्रव्य कोचीत तीन शर्ट आणि तीन पँट घेवून आला होता. द्रव्यने गुजरातपासून अगदी दूर असलेले केरळमधील कोची हे शहर निवडले. द्रव्यला मल्याळम आणि हिंदी नीट बोलता येत नव्हते, म्हणूनच त्याने कोची हे शहर निवडले.
‘मला पहिले पाच दिवस नोकरी ही मिळाली नाही आणि राहण्याची व्यवस्थाही नव्हती. खरेतर मी निराश झालो होतो. ६० ठिकाणी मला नोकरीसाठी नाकारले होते. सामान्य लोकांसाठी नोकरीचे काय महत्व असतं, याची जाणीव तेव्हाच मला झाली' असे द्रव्यने सांगितले. ' मी जिथे नोकरी मागण्यासाठी गेलो, तिथे मी खोटी कहाणी सांगितली. मी गुजरातमधील एका गरीब कुटुंबात जन्माला आलो आणि फक्त १२ वी पर्यंत माझे शिक्षण झाले असं मी सांगायचो. ब-याच प्रयत्नांनंतर एका बेकरीत मला पहिली नोकरी मिळाली. त्यानंतर एक कॉल सेंटर, मग चपलांचे दुकान आणि मॅकडोनाल्ड्स अशा अनेक ठिकाणी मी काम केलं. संपूर्ण महिनाभर विविध ठिकाणी काम केल्यानंतर महिनाअखेरीस मी ४ हजार रुपये कमावले. हे सर्व करण्यापूर्वी मला कधीच पैशांची चिंता करावी लागली नव्हती. पण कोचीतील त्या महिन्याभरात मला जेवणासाठी ४० रुपये खर्च करतानाही झगडावे लागत होते. एका लॉजमध्ये राहण्यासाठीही मला २५० रुपये भरावे लागत होते. त्या एका महिन्यानंतर मला पैशांची आणि कष्टांची खरी किंमत समजली' अशा शब्दांत द्रव्यने आपल्या भावना मांडल्या. द्रव्य सध्या गुजरातमध्ये त्याच्या घरी परतला आहे. घरी परतून त्याने कोचीत त्याला सहकार्य केलेल्यांना आवर्जुन फोन ही केले. ------------------------------------------------------------------------------

No comments:

Go your Empire

मॉड्युलर किचन

 modularkitchensindia.in/blog/    यह ब्लॉग मॉड्युलर किचन डिज़ाइन को विस्तार से जानने और संदर्भ में लाभदायक जानकारी प्रदान करता है। यहां आपको...