Wednesday, August 30, 2017

कर्मचा-यांना बोनस म्हणून घर व गाडी वाटणारा 'चौथी पास' उद्योजक

कर्मचा-यांना बोनस म्हणून घर व गाडी वाटणारा 'चौथी पास' उद्योजक
----------------------------****------------------------------------
देशातील सर्वच कर्मचा-यांना हेवा वाटावा असा आपल्या कर्मचा-यांना बोनस देणारे सावजीभाई ढोलकीया हे फक्त चौथी शिकलेले आहेत. मात्र त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि नम्रतेने त्यांना आज भारताती एक यशस्वी उद्योगपती बनवले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोट्यवधीचा बोनस देणारे 'हरिकृष्ण एक्स्पोर्ट'चे मालक सावजीभाई ढोलकीया यांनी एवढा मोठा बोनस देण्यामागील कारण स्पष्ट केले आहे.

माझ्या कर्मचा-यांच्या कर्तृत्वाच्या तुलनेत मी त्यांना दिलेले बोनस अगदीच नगण्य असल्याचे मत व्यक्त केले. मी फक्त चौथी पर्यंत शिकलेलो आहे. १२व्या वर्षी मी शिक्षणाला राम राम ठोकला आणि हि-यांच्या व्यवसायामध्ये काम करण्यास सुरुवात केली. मी स्वत: कसलेही शिक्षण घेतलेले नाही. मात्र मी रोज वाचन करतो आणि रोज काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो, असे सावजीभाई यांनी स्पष्ट केले.

मी माझ्या भावांसहीत सुरतमध्ये असेच काम करीत होतो. आम्हा चार भावंडांपैकी एकानेही दहावीच्या पुढे शिक्षण घेतेले नाही. माझ्या सर्वात छोटा भाऊ दहावी पास असल्याचे ढोलकीया सांगतात. देवाच्या कृपेने मला माझ्या घरच्यांचा कायमच पाठिंबा राहिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

आम्ही कर्मचा-यांना बोनस देण्यासाठी ५० कोटींचे बजेट निश्चित केले होते. मी सर्वांसाठी गाड्याच घेणार मात्र नंतर आमच्या लक्षात आले की कंपनीतील २०० कर्मचा-यांकडे स्वत:चे घर नाही, म्हणून त्यांना घर देण्याचा आम्ही निर्णय घेतला. तर ५०० कर्मचा-यांकडे घर आणि गाडी दोन्ही असल्याने आम्ही त्या प्रत्येकाच्या पत्नीसाठी हि-याचे दागिने देण्याचे निश्चित केले. गुजरातमध्ये अनेकदा नव-याला पाठिंबा देणा-या त्याच्या चांगल्या-वाईट परिस्थितीमध्ये ठामपणे त्याच्या पाठिशी उभ्या राहणा-या स्त्रीयांचे कौतुक केलेच जात नाही. म्हणून आम्ही मुद्दाम दागिने देण्याचा निर्णय घेल्याचे ढोलकीयांनी मुलाखतीमध्ये सांगितले.

मी खुप छोटा माणुस आहे तुम्ही मला मोठे केले आहे. आमच्या कंपनीच्या या निर्णयाची देशभरात चर्चा होईल अशी अपेक्षा नव्हती. मात्र मला खात्री आहे की एवढी प्रसिद्धी मिळाल्यानंतर इतर उद्योजकही त्यांच्या कर्मचा-यांना चांगल्या सोयीसुविधा देतील. आमच्या कंपनीमध्ये एक क्रिकेटचे मैदान आहे जे मी गांगुलीला लंडनमध्ये खेळताना पाहिल्यानंतर बांधले. येथे माझ्या कंपनीतील कर्मचारी क्रिकेट खेळातात आणि त्यांना मी पव्हेलियनमध्ये बसून पाहतो. आमच्या कंपनीत व्ययामशाळा आहे, सोना बाथची सोबतच अनेक खेळांचे कोर्टही कंपनीच्या आवारातच असल्याची माहिती ढोलकीयांनी दिली.

मी ज्यांना इतके काही देऊ केले आहे ते माझे कर्मचारी आहेत. ते मला तोट्यात जाऊन देणार नाहीत असा माझा विश्वास आहे. म्हणूनच आम्ही प्रामाणिकपणे काम करणा-यांना सन्मानीत करण्याचे ठरवले. मी जेव्हा १९९१मध्ये कंपनी सुरु केली होती त्यावेळी आम्ही १ कोटी रुपयांचा माल निर्यात करत होतो. आता हाच आकडा ६०० कोटींपर्यंत गेला आहे. आमच्या व्यवसायातील या भरभराटीसाठी आमचे कर्मचारी जबाबदार आहेत. त्यामुळेच आम्ही आमच्या कंपनीतील सर्व १२०० कर्मचा-यांच्या कामाचा लेखाजोखा तपासून आमची कंपनी पुढे नेण्यामध्ये कोणचा किती वाटा आहे याची माहिती गोळा केली. माझ्या मुलाने न्यूयॉर्कमधून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. मागील सहा वर्षापासून तो मला या व्यवसायात मदत करती आहे. कोणला कोणते बक्षिस द्यायचे हे ठरवण्यासाठी आमची एक पद्धत ठरलेली आहे. ते सर्व काम माझा मुलगाच पाहतो. प्रत्येकाच्या योगदानानुसार त्याला बक्षिस देण्यात येते. इतरांनीही आमच्या १२०० कर्मचा-यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जोमाने आपआपल्या श्रेत्रात प्रगती करावी. कर्मचा-यांकडे कौशल्य असते. मात्र मालकाने त्याच्या कौशल्याला वेळोवेळी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असेही सावजीभाई यांनी सांगितले.

माझे सर्व कर्मचारी वेळेवर कर भरतात. आमच्या कर्मचा-यांकडून १० कोटीचा कर भरला जातो. कर्मचा-यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. म्हणूनच आमच्या कंपनीमध्ये हिरा कापणा-याला डायमंड इंजिनिअरची पोस्ट दिली जाते. तर हिरा पॉलिश करणा-याला डायमंड आर्टिस्टची पदवी दिली जाते. या लोकांमध्ये खूप कला असूनही त्यांना फक्त ७० ते ८० हजार पगार आहे. म्हणूनच मी त्यांना इतर सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. मी सोशल बिझनेस करतो. माझ्या कंपनीमध्ये २१ राज्यातील ३६१ गांवांमधील कर्मचारी काम करतात. त्यांचे प्रत्येकाचे पालक मला ओळखतात. मी सर्वांना हरिद्वारच्या यात्रेला घेऊन गेलो होतो त्यामुळे आम्हा सर्वांचे अगदी घरोब्याचे संबंध आहेत, असे सांगत त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या घरच्यांविषयीची भावना देखील व्यक्त केली.

जेव्हा तुम्ही एखाद्याला पैसे देता तेव्हा त्याच्यावरील जबाबदारी वाढते. मी एक व्यवसायीक आहे म्हणून मी कधी तोट्यात जाण्याच सौदा करणार नाही किंवा एखाद्याला उगच सहानभूती दाखवत नाही. मी इतर व्यवसायींकाना कर्मचा-यांना खुष ठेऊन व्यवसाय कसा करावा हे दाखवत आहे. मात्र त्यासाठी कर्मचा-यांनीही माझ्या कंपनीतील कर्मचा-यांसारखे कष्टाळू असावे असे मला वाटते. मी पहिल्यांदा एखादी वस्तू देतो आणि त्याचा मोबदला नंतर घेतो. पण बरेच जण याच्या उलटे करतात त्यामुळे कर्मचारी दु:खी होऊन मनापासून काम करण्याऐवजी करायचे म्हणून काम करतात. माझ्या कंपनीमधून अद्याप एकाही कर्मचा-याला काढून टाकण्यात आलेले नाही. कर्मचा-याला काही येत नसेल तर आमच्या गरजेनुसार त्याला प्रशिक्षण देऊन त्यांना पुन्हा कामावर ठेवतो. माझ्या कंपनीतून हिरे नाही तर माणसे तयार होऊन बाहेर पडली पाहिजेत, असे मला मनापासून वाटत असल्याचे मत ढोलकीया यांनी व्यक्त केले.
-------------------------------------------------------------------------------

Friday, August 11, 2017

अब्जाधीश पित्याने मुलाला शिकवला


अब्जाधीश पित्याने मुलाला शिकवला ''जीवन जगण्याचा धडा''.
------------------------------------ तुम्हाला गुजरातमधील हि-यांचे प्रसिद्ध व्यापारी सावजी ढोलकिया तर माहितच असतील. होय, हे तेच व्यापारी आहेत ज्यांनी आपल्या कर्मचा-यांना बोनसच्या रुपात गाडी आणि फ्लॅट दिले होते. ६००० कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले सावजी ढोलकिया आजकाल त्यांचा मुलगा द्रव्य याला अनोखी शिकवण देण्यासाठी चर्चेत आले आहेत. सावजी यांनी आपल्या २१ वर्षीय मुलाला आयुष्यातील कठीण प्रसंगांना कसे सामोरे जावे याचे धडे शिकवायचे ठरविले आहे. मुलांना लाडाकोडात वाढवण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्याचे अती लाडाचे दुष्परिणामांची मोठी चर्चा ही होत असते. मुलांना कसे वाढवले पाहिजे आणि त्यांच्यातील क्षमतांची वाढ कशी केल पाहिजे याचा उत्तम धडा गुजरात येथील हिऱ्यांचे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी घालून दिला आहे. ६ हजार कोटींची कंपनी चालवणाऱ्या ढोलकिया यांनी त्यांचा मुलगा द्रव्य याला कोचीमध्ये पाठवले होतेकोचीत कसेही १ महिना जगून दाखव असे त्यांनी द्रव्यला सांगितले. वडिलांची हा आदेश द्रव्यने मानत कोचीत एका बेकरीमध्ये १ महिना नोकरी केली. सावजी यांची गुजरातमध्ये हरेकृष्ण डायमंड एक्सपोर्ट या कंपनीचे मालक आहेत. ७१ देशांत ते हिरे पाठवतात. त्यांचा मुलगा द्रव्य २१ वर्षांचा असून तो अमेरिकेत एमबीए करतो. घरी तो सुटीवर आला असताना वडिलांनी त्याची रवानगी कोची येथे केली आहे. सावजी यांनी द्रव्यला ७ हजार रुपये खर्चासाठी दिले असून हे पैसे अगदीच निकड पडली तरच खर्च करण्याची सक्त सुचना त्याला दिली होती. मी त्याला ३ सुचना केल्या होत्या. एक म्हणजे त्याने नोकरी मिळवण्यासाठी कोठेही माझी ओळख सांगायची नाही, मोबाईल वापरयचा नाही आणि मी दिलेले ७ हजार रुपये खर्च करायचे नाहीत. गरीब कसे जगतात, नोकरी मिळवण्याचा संघर्ष काय असतो हे त्याला कळले पाहिजे. म्हणून मी त्याला एक महिना तुझ्या पायावर उभे राहून दाखव असे सांगितले होते, असे सावजी म्हणाले. तसेच एकाच ठिकाणी एक आठवड्यापेक्षा जास्त काळ नोकरी करायची नाही अशी ही त्याला सुचना होती. द्रव्य कोचीत तीन शर्ट आणि तीन पँट घेवून आला होता. द्रव्यने गुजरातपासून अगदी दूर असलेले केरळमधील कोची हे शहर निवडले. द्रव्यला मल्याळम आणि हिंदी नीट बोलता येत नव्हते, म्हणूनच त्याने कोची हे शहर निवडले.
‘मला पहिले पाच दिवस नोकरी ही मिळाली नाही आणि राहण्याची व्यवस्थाही नव्हती. खरेतर मी निराश झालो होतो. ६० ठिकाणी मला नोकरीसाठी नाकारले होते. सामान्य लोकांसाठी नोकरीचे काय महत्व असतं, याची जाणीव तेव्हाच मला झाली' असे द्रव्यने सांगितले. ' मी जिथे नोकरी मागण्यासाठी गेलो, तिथे मी खोटी कहाणी सांगितली. मी गुजरातमधील एका गरीब कुटुंबात जन्माला आलो आणि फक्त १२ वी पर्यंत माझे शिक्षण झाले असं मी सांगायचो. ब-याच प्रयत्नांनंतर एका बेकरीत मला पहिली नोकरी मिळाली. त्यानंतर एक कॉल सेंटर, मग चपलांचे दुकान आणि मॅकडोनाल्ड्स अशा अनेक ठिकाणी मी काम केलं. संपूर्ण महिनाभर विविध ठिकाणी काम केल्यानंतर महिनाअखेरीस मी ४ हजार रुपये कमावले. हे सर्व करण्यापूर्वी मला कधीच पैशांची चिंता करावी लागली नव्हती. पण कोचीतील त्या महिन्याभरात मला जेवणासाठी ४० रुपये खर्च करतानाही झगडावे लागत होते. एका लॉजमध्ये राहण्यासाठीही मला २५० रुपये भरावे लागत होते. त्या एका महिन्यानंतर मला पैशांची आणि कष्टांची खरी किंमत समजली' अशा शब्दांत द्रव्यने आपल्या भावना मांडल्या. द्रव्य सध्या गुजरातमध्ये त्याच्या घरी परतला आहे. घरी परतून त्याने कोचीत त्याला सहकार्य केलेल्यांना आवर्जुन फोन ही केले. ------------------------------------------------------------------------------

प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडाला फेस आणणाऱ्या निरमाची कहानी

प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडाला फेस आणणाऱ्या निरमाची कहानी
सबकी पसंद निरमा!
---------------------------------------------
मेहसाणा, गुजरात मधील एक ग्रामीण भाग. विशेषत: दूध-दुभत्यांसाठी प्रसिद्ध. याच भागातील करसनभाई शेतकरी दांपत्याच्या पोटी जन्मला. वयाच्या २१ व्या वर्षी रसायनशास्त्राचा पदवीधर झाला. राज्यसरकारच्या भूगर्भ आणि खनिज विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करु लागला. १९६९ सालच्या आसपास फॉस्फेट फ्री सिंथेटीक डिटर्जंट पावडर म्हणजेच फॉस्फेट नसलेली कपडे धुण्याची भुकटी त्याने तयार केली. ही पावडर तो त्या परिसरात घरोघरी जाऊन विकायचा. त्यावेळी जर कोणी भाकित केलं असतं की ही पावडर करसनला कोट्याधीश बनविणार आहे तर त्याला वेड्यात काढलं असतं. पण याच पावडरमुळे करसन नावारुपाला आला. ही पावडर म्हणजे काश्मिर पासून कन्याकुमारी आणि गुजरात ते आसाम पर्यंत नावारुपाला आलेली आणि सर्वांत जास्त वापरली गेलेली निरमा पावडर होय. या निरमा पावडरमुळे ४ हजार करोड रुपयांपर्यंत पोहोचलेला करसनभाई म्हणजेच करसनभाई खोडीदास पटेल. व्यावसायिक जगतात यांना के.के.पटेल या नावाने ओळखले जाते.

सुरुवातीला करसनभाई ३.५० पैसे प्रति किलो दराने ही पिवळी भुकटी दारोदारी जाऊन विकायचे. यावेळी हिंदुस्थान लिव्हरची सर्फ पावडर १५ रुपये किलो भावाने मिळायची. आपल्या १० बाय १० च्या खोलीत करसनभाई पावडर तयार करत. १५ ते २० किलो पावडरची गोण सायकलवर टाकून ते १७ किलोमीटर परिसरात पावडर विकत. निव्वळ तीन वर्षांत उत्तम दर्जामुळे त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला. या पावडरला त्यांनी आपल्या मुलीच्या, निरुपमाच्या नावावरुन निरमा हे नाव दिलं. दुर्दैवाने निरुपमाचं अपघाती निधन झालं. आपल्या उत्पादनाचा बाजारात चांगलाच जम बसला आहे हा आत्मविश्वास आल्यानंतर करसनभाईने सरकारी नोकरी सोडली. पूर्णपणे त्यांनी व्यवसायात स्वत:ला झोकून दिले. हळूहळू त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्रात आपले पाय रोवले.

१९८५ पर्यंत देशाच्या विविध भागांत निरमा एक विश्वसनीय घरगुती ब्रॅण्ड म्हणून नावारुपास आला. १८ वर्षांनतर निरमाने निळ्या रंगाची निरमा सुपर डिटर्जंट पावडर बाजारात आणली. आक्रमकपणे त्यांनी याची जाहिरात देखील केली. १९९४ साली शेअरबाजारात निरमा नोंदणीकृत झाली. १९९९ पर्यंत डिटर्जंट पावडर सोबतच अंघोळीचा साबण, सौंदर्यप्रसाधने आदी क्षेत्रात निरमा नावाजली जाऊ लागली. ही उत्पादने फॉस्फेट न वापरता बनवली गेल्याने पर्यावरणपूरक म्हणून देखील ओळखू जाऊ लागली.

१९६९ साली एका व्यक्तीनिशी सुरु झालेल्या या कंपनीमध्ये आजमितीस १४ हजारहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. ४ हजार करोड रुपयांहून अधिक उलाढाल ही कंपनी करते. २००४ साली निरमाने ८ लाख टन पावडरची निर्मिती केली होती. पावडरनिर्मितीचा हा एक उच्चांक मानला जातो. आज निरमा कंपनी निव्वळ पावडरच नव्हे तर अंघोळीचा साबण, हवाबंद डब्ब्यातील अन्नपदार्थ, कारखान्यास लागणारे उत्पादने, मीठ आणि खते देखील तयार करते. २००२ मध्ये निरमा हा ब्रॅण्ड आपल्या भारतात ‘झपाट्याने बदलत जाणारी ग्राहकोपयी वस्तू’ या गटात ९ व्या स्थानी होता. २००३-०४ मध्ये देशाचा सुपरब्रॅण्ड म्हणून निरमाची निवड झाली होती.

‘कमी किंमत- उच्च दर्जा’ ही निरमाची खासियत. उत्पादक-वितरक-घाऊक व्यापारी- किरकोळ व्यापारी- ग्राहक अशा साखळीतून जर उत्पादन जात असेल तर एका रुपयांत तयार होणारी वस्तू ग्राहकांजवळ पोहोचेपर्यंत १०० रुपयांची झालेली असेल. हे करसनभाईंना ठाऊक होते. त्यांनी थेट दुकानदारांनाच माल विकण्याचा निर्णय घेतला. मात्र माल ठेऊन जा आणि विकल्यानंतर पैसे घेऊन जा अशी व्यवहाराची पद्धत असल्याने निरमा कंपनीचा माल आणि पैसा हे दोन्ही महत्वाचे घटक बाजारात मोठ्या प्रमाणावर अडकले. परिणामी निरमाचा खप घटला. करसनभाईंनी आपल्या कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आणि बाजारात अडकलेला माल किंवा पैसा परत आणा असे फर्मान सोडले. बाजारातून सगळा माल निरमा कंपनीने परत घेतला.
एखादा दुसरा उद्योजक असता तर त्याने हारच मानली असती. पण हार मानतील ते करसनभाई कसले. प्रसिद्धीची ताकद ओळखणाऱ्या करसनभाईंनी एक जाहिरात तयार केली. आणि रेडीओ, सिनेमागृह, दूरचित्रवाणी या माध्यमातून तब्बल एक महिना निरमाच्या जाहिरातींचा मारा केला. ही जाहिरात इतकी प्रभावी होती की निरमाच्या मागणीने दुकानदार त्रस्त झाले. या जाहिरातीने तब्बल दोन दशके रुपेरी पडदा गाजविला. सर्वांत जास्त काळ एकच जाहिरात झालेली ही जाहिरात म्हणजे ‘निरमा, निरमा, वॉशिंग पावडर निरमा, दूध सी सफेदी...’

लोकांच्या प्रचंड मागणीने दुकानदार त्रस्त झाले. त्यांनी कंपनीकडे पावडर मागितली. परत करसनभाईने कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली. दुकानदारांना पावडर देण्यास सांगितले मात्र एका अटीवर, ‘आधी पैसे, मग माल’. निरमाच्या या जाहिरातीमुळे प्रतिस्पर्धी कंपन्याच्या तोंडाला फेस आणला होता हे मात्र खरे. बाजारपेठेला शब्द्श: करसनभाईने झुकविले होते.

करसनभाई पटेल हे समाजसेवी उद्योजक म्हणून देखील ओळखले जातात. अनेक शैक्षणिक, संशोधन संस्था त्यांनी निर्माण केल्या आहेत. निरमा एज्युकेशन रिसर्च फाऊंडेशन( एनईआरएफ) मार्फत विविध शैक्षणिक संस्था चालविल्या जातात. निरमा लॅब्जच्या माध्यमातून अडचणींना सामोरे जाणाऱ्या होतकरु तरुण उद्योजकांना उद्योजकीय मार्गदर्शन केले जाते. निरमा मेमोरिअल ट्रस्ट, निरमा फाऊंडेशन, चनासमा रुप्पुर ग्रामविकास ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य केले जाते. करसनभाईंनी निरमा विद्यापीठाची स्थापना देखील केलेली आहे.  करसनभाईंच्या उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी सन २०१० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांना पद्मश्रीने गौरविण्यात आले होते.

लहानपणी रामायण, महाभारत पाहताना निरमा, निरमा म्हणत पिवळ्या रंगाचा फ्रॉक घातलेली एक छोटी मुलगी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेई. प्रत्येक घरातल्या मुलीचं जणू काही ती प्रतिनिधीत्वच करायची. या मुलीला नावारुपाला आणणारा तिचा जनक मात्र नेहमीच पडद्यामागे राहिला. करसनभाईंची हा शून्यातून कोटीपर्यंतचा प्रवास प्रत्येक तरुणास स्फूर्तीदायी आहे.
<script async src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>
<ins class="adsbygoogle"
     style="display:block; text-align:center;"
     data-ad-format="fluid"
     data-ad-layout="in-article"
     data-ad-client="ca-pub-5619353188922776"
     data-ad-slot="5141165527"></ins>
<script>
     (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>

Tuesday, August 8, 2017

खिशात २० रुपये नसणाऱ्या कोट्याधिशाची कहाणी

खिशात २० रुपये नसणाऱ्या कोट्याधिशाची कहाणी

त्याच्या वडलांचा आगप्रतिबंधक उपकरण तयार करण्याचा कारखाना होता. वयाच्या आठव्या वर्षांपासून तो वडलांसोबत कारखान्यात जाई. त्याला कारखान्याविषयी चांगली माहिती होती. कामगार, उत्पादन, ग्राहक यांच्याबरोबर त्याचं एक वेगळंच नातं तयार झालं होतं. शाळेत असताना शाळा आणि कॉलेजच्या सुट्ट्यांदरम्यान कारखान्यात जाण्याचं त्याने वेळापत्रकंच तयार केलं होतं. मात्र लहान भाऊ असल्यामुळे कारखान्याची जबाबदारी वंशपरंपरागत पद्धतीने मोठ्या भावाकडे आली. काहीसा मनात खट्टू झालेल्या त्याने स्वत:ची वेगळी कंपनी सुरु करण्याचे ठरविले. त्यावेळेस खिशात २० रुपये सुद्धा नव्हते. पण स्वप्न मात्र मोठ्ठं होतं. एका मित्राकडून ५०० रुपये कर्ज घेऊन त्याने आपल्या व्यवसायास सुरुवात केली. १९८४ मधली ही घटना आहे. अवघ्या ३० वर्षांत त्याची कंपनी १ हजार कोटी रुपयांची उलाढाल करु लागली. ही रोमांचक कथा आहे नितीन फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नितीन शाह यांची.

कोणत्याही एकत्र कुटुंबपद्धतीत जी वंशपरंपरागत पद्धत असते त्यालाच अनुसरुन नितीनच्या वडलांनी आपली कंपनी झेनिथ फायर सर्व्हिसेसची सूत्रे मोठ्या मुलाकडे सोपविली. आता आपण आपलं स्वत:चं काहीतरी अस्तित्व निर्माण करुन दाखवूया असं नितीनला वाटू लागलं. पण करणार काय हा यक्षप्रश्न होताच. पण त्यापेक्षा सुद्धा महत्वाचा प्रश्न होता तो पैशाचा. एखादा व्यवसाय सुरु करायचा म्हटला तर पैसा लागणारंच. आपल्या खिशात २० रुपयेसुद्धा नाही. कोण का म्हणून आपल्याला पैसे देईल असे त्याला वाटू लागले. मात्र जिथे पैसा काम करत नाही तिथे जोडलेली नाती काम करतात. नितीनच्या एका मित्राने जानेवारी १९८४ मध्ये ५०० रुपये कर्जाऊ दिले. नितीन मित्राच्या गॅरेज मध्ये काम करु लागला. त्यानंतर त्याने मेकॅनिकल इंजिनीयरिंगचा डिप्लोमा मिळविला.

नितीन वडलांसोबत व्यवसाय सांभाळत असताना त्याने काही चांगले संबंध तयार केले होते. यापैकी एक अणुऊर्जा विभागात जेष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मदतीने नितीनला अणुऊर्जा विभागातील आगीशी संबंधित असणाऱ्या उपकरणांची निगा राखण्याचे कंत्राट मिळाले. आगप्रतिबंधक सिलेंडरच्या दुरुस्ती आणि निगा राखण्याचं हे कंत्राट होतं. अणुऊर्जा विभाग हे सिलेंडर्स नितीन काम करत असलेल्या गॅरेज मध्ये पाठवत. नितीनने ३ कर्मचाऱ्यांना नियुक्त केले होते. त्या तिघांच्या सहाय्याने नितीन सिलेंडर्स दुरुस्त करायचा. अणुऊर्जा विभाग ते दुरुस्त झालेले सिलेंडर्स परत घेऊन जात. काम सुरु केलं त्यावेळेस ट्रॉली, पुली, कन्व्हेयर सारखी उपकरणं नितीनकडे नव्हती. किंबहुना ती घेण्यासाठी पैसे नव्हते. पण हातात उपलब्ध असलेल्या साहित्याच्या जोरावर तो काम करत राहिला. रोलिंग मशीनसाठी तो जुन्या गाडीचा भाग वापरायचा. याचा खर्च होता अवघा हजार रुपये. नवीन मशिन किंमत होती सुमारे ४५ हजार रुपये. अशाप्रकारे विविध क्लृप्ता काढून नितीन कमी खर्चात कंपनी चालवित होता.

साधारण ६-७ महिन्यांनी घाटकोपर मध्ये २० लाख रुपये बाजार मूल्य असलेली १२०० चौरस फूटाची एक जागा खरेदी केली. जमविलेले सारे पैसे या जागेत गुंतविले. अणुऊर्जा विभागाचं काम करत असतानाचं ओळखीने ओएनजीसीचं काम देखील मिळालं. हळूहळू कामाचा वेग वाढला. १९८६ मध्ये नितीनच्या कंपनीने ७ कोटींचा टप्पा गाठला. ही तर सुरुवात होती. अवघ्या २ वर्षांच्या अथक मेहनतीचं हे फळ होतं. १९८७ मध्ये कंपनी विस्ताराचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी १ कोटी रुपये खर्चून गुजरातला ५० हजार चौरस फूटाची जागा खरेदी करुन आगप्रतिबंधक उपकरण निर्मितीचा कारखाना तिथे सुरु केला. दरम्यान आगीशी संबंधित सर्व घटक एकाच छताखाली देण्याचा निर्णय नितीनने घेतला. आगप्रतिबंधक उपकरणांचं डिझाईन, निर्मिती, निगा राखणे हे सर्व कंपनी पुरवू लागली. १९८८ मध्ये गोवा आणि मुंबईच्या अग्निशमन दलाचे कंत्राट कंपनीला मिळाले.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासोबतच मुळात ही आग शोधून काढणारं यंत्र बनविणाऱ्या इंग्लंडमधील अपोलो फायर डिटेक्टर कंपनीसोबत नितीनच्या कंपनीने हातमिळवणी केली. त्यांची उत्पादने नितीनची कंपनी भारतात विकू लागली. उत्पादन निर्मिती ते उत्पादन विपणन व विक्री असा नवीन प्रवास सुरु झाला. २०१० मध्ये नितीन शाह यांनी संयुक्त अरब अमिरातीतील न्यू एज कंपनी ४० कोटी रुपयांना विकत घेतली. न्यू एज कंपनीचे अबुधाबी, दुबई, शारजाह येथे कार्यालये आहेत. युरोपियन बाजारपेठेसाठी फायरटेक सिस्टम नावाची कंपनी सुरु केली आहे. नितीन शाह यांची जगातील एकमेव अशी कंपनी आहे जी आगप्रतिबंधक उत्पादनांसोबतच जड वायू, रासायनिक वायू आणि पाण्याची निर्मिती करते. ओझोन फ्रेंडली फायर प्रोटेक्शन सिस्टम हे तंत्र भारतात वापरणारी ही पहिली कंपनी होय. कंपनीचा सध्याचा एकत्रित महसूल १००० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

२० रुपये सुद्धा खिशात नसताना नितीन शाह यांनी विजिगीषु वृत्ती कायम ठेवत १००० कोटी रुपयांची कंपनी उभारली. जिथे पैसा नसतो तिथे तुमचे ‘रिलेशन्स’ कामाला येतात. म्हणूनच तुमचे रिलेशन्स जपा. तुमच्यात देखील नितीन शाह दडलाय. त्याला ओळखा. स्वत:चं औद्योगिक साम्राज्य उभारा.

Sunday, August 6, 2017

Inspirational Quotes About Life and Success

Empire Sharaempire Blogspot.com
Inspirational Quotes About Life and Success
नक्की वाचा आणि शेर करा
===================
हरवलेला आत्मविश्वास

एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. Creditors (धनको) त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते.

असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते. अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो. वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.

व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.

बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, ययाने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून. ङ्ख असे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले.

गेले वर्षभर आपल्याजवळ 5 लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता. अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती.

तात्पर्य-आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते.

हा आणि अशे सुंदर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:-https://saharaempire.blogspot.in

#marathi #motivation

Go your Empire

मॉड्युलर किचन

 modularkitchensindia.in/blog/    यह ब्लॉग मॉड्युलर किचन डिज़ाइन को विस्तार से जानने और संदर्भ में लाभदायक जानकारी प्रदान करता है। यहां आपको...